spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Worli Bandh महापुरुषांबाबत अवमानास्पद विधानानंतर, पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळी परिसरातही आज बंदची हाक

मुंबईतील (Mumbai News) वरळी (Worli) परिसरात आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटनांसह छोटे पक्ष व त्याचबरोबर वरळीकर रहिवासी यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या राज्यातील शिंदे (Eknath shinde) फडणवीस (Devendra Fadnvis) सरकार विरोधात आज बंद (Mumbai Worli Bandh) करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत करणार आहे. महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला आंदोलन केलं जाणार आहे. त्या अगोदर वरळीत हा बंद असणार आहे.

हेही वाचा : 

Sumeet Pusavale बाळूमामा ‘फेम’ सुमित पुसावळे अडकले लग्न बंधनात, पहा लग्नाचे फोटो

राज्यात महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. अगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari), भाजप नेते सुधांशु त्रिवेदी(BJP leader Sudhanshu Trivedi), प्रसाद लाड(Prasad Lad), मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तर राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली होती. याच वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज वरळीतही बंद पुकारण्यात आला आहे.

हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत, रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून (Maharashtra Karnataka Borderism) दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का सागला असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून (maha vikas aghadi) त्याविरोधात आता येत्या १७ डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss