मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः हॉस्पिटलमध्ये भेटण्यास गेले आहेत तसेच अमित ठाकरे देखील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आज दि ३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास संदीप देशपांडे हे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे गेले होते. मॉर्निंग वॉकच्या दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करण्यास आलेले हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत. संदीप देशपांडे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंदुजा रुग्णालयात संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः गेले आहेत. तसेच अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर देखील रुग्णालयात गेले आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे आज देखील मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात गेले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगितलं जात आहे.

मनसे नेते संतोष धुरी म्हणाले, “संदीप देशपांडेंवर भ्याड हल्ला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकवेळी हा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकवेळी संदीप देशपांडे यांना एकट्याला पाहून चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता. हा पूर्वनियोजित कट होता. क्रिकेट स्टम्पने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.” संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळतात मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हल्लेखोरांना बघून घेऊ, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version