spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट!, बरगड्यांना फ्रॅक्चर तर डोक्याला किरकोळ जखमा, पण प्रकृती स्थिर

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारला बुधवारी मध्यरात्री परळी शहराजवळ (Parli city) अपघात झाला

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारला बुधवारी मध्यरात्री परळी शहराजवळ (Parli city) अपघात झाला तेव्हा त्यांच्या छातीला किरकोळ दुखापत (Minor chest injury) झाली, असे सांगितले होते. ही घटना बीड जिल्ह्यातील परळीजवळ मध्यरात्री १२.३० वाजता घडली. त्यानंतर काल रात्री धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईला आणलं केलं आहे. धनंजय मुंडेंच्या बरगड्यांना फ्रॅक्चर तर डोक्याला किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

धनंजय मुंडे यांना एअर एॅम्ब्युलन्सनं (Air ambulance) मुंबईला (Mumbai) हलवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील दैनंदिन कामकाज आणि बैठका आटोपून परतत होते आणि त्यांचा अपघात झाला. धनंजय मुंडेंच्या दोन बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्या आहेत. तर त्यांच्या डोक्याला किरकोळ जखमाबी देखील झाल्या आहेत. डोक्याला लागलेल्या जखमा बाहेरून असल्यामुळे या थोड्या दिवसात बऱ्या होतील. असं त्यांच्या कार्यलयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर याव्यतिरिक्त त्याच्या छातीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही हे रोपोर्ट्समधून समोर आले आहे. पण त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं देखील म्हटलं जात आहे.

डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकालीन ट्विटर हॅन्डल वरून देखील या बाबतची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट म्हटलं,”काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास @dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे”.

तसेच धनंजय मुंडे यांच्या अपघात झाल्यानंतर त्यांच्या अपघातादरम्यानचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे कि, त्यांच्या गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडीचं बोनेट पूर्ण पणे डॅमेज झालं आहे. तसेच चालकाचा पापड सुटल्याने हा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या गाडीचा अपघात झालेली गाडी हि BMW कंपनीची होती असे देखील समोर आले आहे.

 

हे ही वाचा:

Yogi Adityanath यांचं उत्तर प्रदेश विकासावर भाष्य, उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा…

Amazon मध्ये काम करणाऱ्या १८,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा!

पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरे स्वतः राहणार नाशिकमध्ये उपस्थित, जानेवारीअखेरीस होणार जाहीर सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss