BMC Budget 2023, उद्या सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

दि. १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प हा जाहीर झाला आहे. आणि आता उद्या दि ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

BMC Budget 2023, उद्या सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

दि. १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प हा जाहीर झाला आहे. आणि आता उद्या दि ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष हे लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी अधिकृतपणे जाहीर केले की, २०२३ – २४ या वर्षासाठीचा आपला आर्थिक अर्थसंकल्प शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०. ३० वाजता मुख्यालयात सादर केला जाणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त, अश्विनी भिडे हे बीएमसी प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना शैक्षणिक बजेट सादर करतील तर एएमसी पी वेलरासू संपूर्ण अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यानंतर ते रात्री ११. ३० वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधी सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाला विशेष असे महत्त्व आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतुदीची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांना काय मिळणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

उद्या मुंबईचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. शनिवारी सादर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्था सशक्तीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक वर्षातील अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हे ही वाचा:

मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची जत्रा | Anganewadi Jatra | Devendra Fadnvis | Narayan Rane | BJP |

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले!, नाना पटोले

तब्बल ३० तासांच्या मोजणीनंतर अमरावतीत धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version