एकीकडे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत तर दुसरीकडे मुंबईसह राज्यात महिल्यांच्या बाबतीतलं अनेक गुन्हे हे समोर येत आहेत. अश्तातच आता यात आणखी एका गुहांची भर पडली आहे. मुंबईमधून आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर (Worli Sea Face) एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. या अज्ञात तरुणीच्या मृतदेहामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मुंबईच्या वारली परिसरातून आताच्या घडीची सर्वत मोदी बातमी समोर आली आहे. एका अज्ञात तरुणीचा मृतदेहा हा वरळी सी फेस परिसरात आढळून आला आहे. एका गोणीत हा मृतदेह होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह गोणीत होता. वरळी पोलिसांनी (Worli Police) याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
या अज्ञात तरुणीची हत्या करून हा सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुरक्षित मानली जाते. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा सवाल उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…
Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध