spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Breaking, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण ही करण्यात आली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण ही करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर आरोप करताना त्यानं चुकीचं काम केल्याचा दावा केला आहे.

आज एच ईस्ट या महानगरपालिका कार्यालयात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलं होत. यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कारवाई करू अस सूत्रांनी सांगितलंय.

शिवसेनेच्या शाखेचं अनधिकृत बांधकाम तोडण्यावरुन हा संपूर्ण वाद सुरु झाला आहे. ही शाखा ठाकरे गटाची असून त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा होत्या. त्या प्रतिमा काढून न घेताच शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवण्यात आला. त्यामुळं चिडलेल्या शिवसैनिकांनी पालिकेत जाऊन थेट संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली.

तसेच आज या संपूर्ण प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले आहेत की, “अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही पण जी शाखा पालिकेकडून पाडण्यात आली. त्या शाखेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता, छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती होती. कार्यकर्ते सांगत होते की, या गोष्टी आम्हाला काढायला द्या. तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यानं जेसीबी चालवून ती शाखा तोडली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि महाराजांच्या प्रतिमेचा अपमान झाला. त्यामुळं शिवसैनिक संतप्त झाले. ते कधीही ही बाब सहन करणार नाहीत.

दरम्यान, अधिकारी मारहाण प्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला जाणार आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

“माझी ड्रॅगन क्वीन” बॉयफ्रेंड अनिश जोगने वाढदिवशी शेअर केला, सई ताम्हणकरचा खास विडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss