spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सीबीटीसी यंत्रणेमुळे प्रवाशांना दिलासा; दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार

लोकल ट्रेनच्या नवीन प्रणालीविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नुकताच मुंबई दौरा केला. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनला कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडले जाणार आहे.

सर्व मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबई उपनगर तसेच ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि नवी मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपले ऑफिस गाठण्यासाठी लोकल ट्रेनवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मुंबईकरांचे आयुष्य हे लोकं ट्रेनच्या तालावर नाचते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये लोकल ट्रेनचे कोलमडणारे वेळापत्रक, सतत होणारे तांत्रिक बिघाड आणि त्यावर प्रवाशांना तासनतास रेल्वे प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभं राहणं हे दृश्य आता वळणीचे पडले आहे. मात्र लवकरच हे चित्र आता बदलण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील लोकल ट्रेन आता वेळेवर धावण्याच्या दृष्टीने एक नवीन यंत्रणा सुरु होणार आहे.

लोकल ट्रेनच्या नवीन प्रणालीविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नुकताच मुंबई दौरा केला. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनला कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर हे १८० सेकंदावरून १५० सेकंदापर्यंत कमी होणार आहे. अशा नवीन प्रकारची यंत्रणा सुरु होणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. सीबीटीसी यंत्रणा प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून करण्यात आला.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी नव्या ३५० एसी लोकल विकत घेण्यासंदर्भात रेल्वेकडून निविदा काढली जाणार आहे. मात्र, एसी ट्रेनला असणाऱ्या राजकीय विरोधामुळे ही प्रक्रिया थांबल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सध्या पश्चिम आणि उपनगरीय मार्गावर रेल्वेच्या एकूण १४ एसी लोकल धावत आहेत. या लोकल प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्या होत्या. एसी लोकलसाठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी ट्रेनची संख्या वाढवण्यात येईल.

हे ही वाचा:

MTDC तर्फे World Tourism Day निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, ‘पर्यटन : शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य

या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन; शिवसेना खासदारांचे पत्र, आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई काय?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss