spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर करवाई करून मध्य रेल्वेने तब्बल ३०३ कोटींचा महसूल केला जमा

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे विभागाने जमा केलेला हा सर्वाधिक महसूल (revenue) आहे.जानेवारी ते जून २०२३ पर्यंत मध्य रेल्वेने १ हजार ३३९ विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे नोंदवली आहेत,

राज्यात अनेकदा बरेच जण तिकीट न काढता प्रवास करताना दिसून येतात. तिकीट न काढता प्रवास करणे हा एक गुन्हा असून दररोज अनेक जण हा गुन्हा (crime) करताना दिसून येतात.अनेकदा आपल्यावर कोण एवढे लक्ष देईल,असा विचार करत अनेक प्रवासी प्रवास करताना तिकीट काढत नाहीत.गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४६ लाख ८६ हजार विनातिकीट प्रवाशी आढळून आले.मात्र यावेळी तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.कोणत्याही रेल्वे विभागाने केली नसेल अशी कामगिरी यावेळी रेल्वे महसूल विभागाने करून दाखवली आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे विभागाने जमा केलेला हा सर्वाधिक महसूल (revenue) आहे.जानेवारी ते जून २०२३ पर्यंत मध्य रेल्वेने १ हजार ३३९ विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे नोंदवली आहेत, यातून रेल्वेची ९४.०४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे, मध्य रेल्वेने महसूल (revenue) उद्दिष्ट ४१.४२% ने पार केलेआहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एप्रिल ते जून २०२३ पर्यंत ५ हजार २५३ प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यातून ३४.१२ लाख रुपयांचा दंड (Penalty) वसूल करण्यात आलेला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात दंड (Penalty) वसूल करण्याची रेल्वे प्रशासनाची ही पहिलीच वेळ आहे.

विनातिकीट प्रवाशांकडून दंड (Penalty) वसूल करून घेण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी (Magistrate) नियुक्त केले आहेत. दंडाधिकारी (Magistrate) पथक म्हणून संलग्न तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ (RPF) कर्मचारी रेल्वे दंडाधिकार्‍यांसोबत (Magistrate) असतात, जे लोकल गाड्यांमध्ये चढून आणि रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी करत असतात. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्याकडून दंड (Penalty) वसूल करता येतो.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss