spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईमध्ये पाणीकपातीची शक्यता, धरणांमध्ये फॅक्त ४८ दिवसांपुरता पाणीपुरवठा

सध्याच्या काळात अनेक समस्या येत आहेत. बिपारजॉय चक्रीवादळानंतर आता मुबंईत पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

सध्याच्या काळात अनेक समस्या येत आहेत. बिपारजॉय चक्रीवादळानंतर आता मुबंईत पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.ज्या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो त्या सातही धारणांमधले पाणी आता फक्त ४८ दिवस पुरेल एवढेच राहिले आहे. जून महिना उभा ठेकला असूनही पावसाचा अजून काही पत्ता नाही. काही जागी वर्षावृष्टी झाली असली तरी बऱ्याच जागी पावसाने सजून तोंड दाखवले नाही. अश्यातच आता पाणीकपातीचा मोठं संकट मुंबईकरांवर येऊन उभं राहील आहे.

जून महिना अर्धा ओलांडून गेल्यावरही पाऊस पडला नाही. हा पाऊस न पडल्याकारणाने मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणखीन १५ दिवस पावसाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या १५ दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर १५ दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणी कपात समस्येला सामोरे जावे लागेल.

मुंबईतील सातही तलावांमध्ये किती पाणीसाठा?

१. अप्पर वैतरणा – शून्य टक्के
२. मोडकसागर – २२.१७ टक्के
३. तानसा – १९.५८टक्के
४. मध्य वैतरणा – १३.३२टक्के
५. भातसा – ५.२७ टक्के
६. विहार – २१.९२ टक्के
७. तुळसी – २८ टक्के

२०२३ मध्ये सातही धरणांमध्ये १५.६९ टक्के इतका पाणीपुरवठा होता. त्यामुळे पालिकेने राज्य सरकारला धरणांमधील पाण्याचा राखीवसाठा करण्याची मागणी केली होती. ही मागणी पुढे मान्य देखील करण्यात आली आहे. आता जूनच्या अखेरीस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मंबईकरांवरच हे संकट टळेल अशी अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना आपल्या पाण्याचा जपून वापर कारावा लागेल. तसेच पाण्याचा अपव्यय देखील टाळावा लागेल.

 

हे ही वाचा:

फक्त एका बटाट्यापासून आणि १ कप साबुदाण्यापासून बनवा Farali Potato Nugget…

Makhana Bhel भेळ बनवा घरच्या घरी, सोप्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी!

Makhana Bhel भेळ बनवा घरच्या घरी, सोप्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी!

Latest Posts

Don't Miss