spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनासुद्धा आमंत्रण

मागील कित्येक वर्षांपासून बहुचर्चेत असलेल्या मुंबईमधील वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचे आज मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

मागील कित्येक वर्षांपासून बहुचर्चेत असलेल्या मुंबईमधील वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचे आज मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. कोस्टल रोड मार्गाचे उदघाट्न झाल्यानंतर वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचे अंतर १० मिनिटांत करता येणार आहे. येणाऱ्या आगामी काळात कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला (Bandra Worli See Link) जोडला जाणार आहे. कोस्टल रोडच्या उदघाटनासाठी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Worli MLA Aditya Thackeray) आणि खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

आज संपूर्ण मुंबईकरांसाठी महत्वाचा दिवस असणार आहे. आज कोस्टल रोडच्या नवीन मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा मार्ग एकूण १०.५८ किमीचा आहे. यामध्ये एकूण ८ मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या ४ आणि जाणाऱ्या ४ असे ८ मार्ग बनवण्यात आले आहेत. तर बोगद्यामध्ये ३ + ३ अश्या मार्गिका बनवण्यात आल्या आहेत. भराव टाकून तयार करण्यात आलेला हा ४.३५ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. पुलांची लांबी २.१९ आहे. तसेच बोगद्याची लांबी २.१९ किमी इतकी आहे. कोस्टल रोड तयार करताना समुद्रामध्ये भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडण्यात आले आहेत. समुद्रात भिंत बांधत असताना समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र वापरण्यात आले आहे. कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढुळपणा याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.समुद्राचा अभ्यास करणारी समिती दर ६ महिन्यांनी सरकारकडे आवाहल देणार आहे.

नेमका कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प?

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. २९ किलोमीटर लांबीचा हा रोड बनवण्यात आला आहे. मुंबई ते कांदिवली असा हा मार्ग आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी असा हा मार्ग सुरु होणार आहे. या प्रकल्पासाठी १२,७२१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.१५.६६ किमी चे ३ इंटरचेंज आणि २.०७ किमी चे एकूण २ बोगदे यांचा यामध्ये समावेश आहे. कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास केल्याने ७० टक्के वेळेची बचत होणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचे आमदार Ravindra Waikar यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश….

Exclusive: ED च्या तुरूंगवारीला घाबरलेल्या Ravindra Waikar यांची आज शिंदेंकडे धाव, निष्ठावंत शिवसैनिकांची वायकरांकडे पाठ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss