spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, १ मे पासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मिळणार खुशखबर

आताच्या घडीची एक मोदी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.

आताच्या घडीची एक मोदी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. दिनांक १ मी म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मुंबई मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. सुमारे २५ टक्के ही सवलत त्यांना मिळणार आहे.

आता मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे राज्यातील जनतेला ही महाराष्ट्र दिनाची ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळणार आहे.ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांसदर्भात सांगितले. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्याची तसेच राज्यातील महिलांनाही एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तसेच ही सुविधा इयत्ता बारावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी, दिव्यांग लोकांसाठी आणि ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक यांच्या साठी असणार आहे. या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

हे ही वाचा : 

भाजपला सुचले तीन वर्षांनंतर शहाणपण, राऊतांची बोलंदाजी निष्प्रभ करण्यासाठी ‘राणेस्र’

बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss