मुंबईतील हवा प्रदुर्षणाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबईतील हवा प्रदुर्षणाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) आणि आस पासच्या परिसरात हवेची गुणवत्ता हि घसरल्याचे दिसून आलं होतं. त्या नंतर मुंबईमधल्या अनेक नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुद्धा सरकारला याबाबतीत प्रश्न विचारला होता. मुंबईतील हवा प्रदुर्षणाला (Air pollution) रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली, गुडगाव, लखनौप्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर (Air purifier tower) बसवावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी बीएमसी आयुक्तांना दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली (Delhi), गुडगाव (Gurgaon), लखनऊ (Lucknow) प्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजन कराव्यात. मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत. तसेच मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High blood pressure) असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करावी. महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण (Beautification of the city) या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे 27 टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी.

हे ही वाचा:

विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार !, नाना पटोले

IND vs AUS Schedule 2023 न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाची पाळी, ४ कसोटी मालिकेनंतर खेळली जाणार ३ वनडे मालिका, पहा संपूर्ण वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version