Sunday, September 29, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री ३ वाजेपर्यंत खलबतं…

Mahayuti Meeting For Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यापूर्वी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठक झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. पाच तास ही खलबतं झाली. यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली. कोण किती जागा लढणार? कोणती जागा कुणाकडे असणार? यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी उपस्थित होते . रात्री ११ वाजता सुरू झालेली ही बैठक पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती, यात महायुतीचे मतदारसंघ वाटप आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोण असावेत यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुमारे ४-५ तास चाललेली ही बैठक महायुतीच्या जागावाटपाबाबत पूर्ण नसून अंतिम बैठक मानली जात आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान प्रत्येक पक्षासमोर असेल. यावरही महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय महायुतीतील सर्वच पक्षांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांवर जोरदार काम करण्याची सूचना केली आहे. तसेच, महाआघाडीत सामील असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर चुकीची टिप्पणी करणे टाळावे लागेल, असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना सांगितले. विधानसभेच्या जागेवर जो पक्ष मजबूत असेल त्याला त्या जागेवरून तिकीट दिले जाईल. याबद्दल कोणाला वाईट वाटू नये.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला होता. तिन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते निवडणुकीत पराभूत झाले होते. तर महाविकास आघाडीला अनेक महत्त्वाच्या जागा जिंकण्यात यश आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत महायुती आघाडी आता सर्व शक्तीनिशी पुढे जात आहे. विधानसभा निवडणुकीत रणनीती काय असेल, कोणाला किती जागा मिळतील, तिकीट इच्छुकांकडून होणारी बंडखोरी कशी टाळता येईल. याबाबत महायुतीमध्ये विशेष नियोजन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss