spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Shinde मुंबईकडे पैसे काढण्याचं यंत्र म्हणून पाहतात, पण आमच्यासाठी आमची Mumbai…Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे बृहन्मुंबई महापालिकेच्या कामाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, असं समजलंय की बृहन्मुंबई महापालिका आता मुंबईसाठी आता ६००० कोटींच्याही वर जाऊन अधिकच्या खर्चासाठी आणखी एका रस्त्याची निविदा काढणार आहे. त्यांनी असे करण्यापूर्वी आणि आम्ही पुन्हा एकदा त्यांचा घोटाळा उघड करण्याआधी, त्यांनी स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा. त्या गोष्टी कोणत्या असतील, याबद्दलची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

२०२३-२४ च्या रस्त्यांची खरी स्थिती काय? हा ₹६०८० चा मेगा-रस्ता घोटाळा आम्ही उघड केला होता. बीएमसीला कंत्राटदारांना खूश करायचे असल्याने २०२२ ह्या वर्षात रस्त्यांच्या कामाच्या निविदाच रद्द केल्या. ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केलाय / काम सुरू केले नाहीये त्यांच्यावर काय कारवाई झालीये? ह्या घोटाळ्यातील आणि त्यापूर्वीच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांची यादी. जानेवारी २०२३ च्या निविदेची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही? जानेवारी २०२३ च्या निवदा घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

भाजप-मिंधे राजवटीच्या कंत्राटदार मित्रांसाठी बीएमसी मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही. ही आमच्या शहराची उघड लूट आहे. लवकरच स्थापन होणारं आमचं सरकार ह्या सर्व कामांना स्थगिती तर देणारच आहे, ह्या घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबवणार आहे, सोबतच ह्या घोटाळ्याची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा होईल ह्याची काळजीही घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. गेल्या २ वर्षांपासून बीएमसी थेट घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्यातर्फे चालवली जात आहे. मुंबईचे १०० कोटी रुपये रेसकोर्सवरील खाजगी मालकीच्या घोड्यांच्या तबेल्यांवर खर्च करण्याच्या मूर्खपणाला बीएमसीने मान्यता दिली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात! पण आमच्यासाठी आमची मुंबई आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणं आमच्या रक्तातच आहे! असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

विशाळगडावरील निष्कासन कारवाईत उच्च न्यायालयाचा अवमान, जितेंद्र आव्हाड यांनी केला पर्दाफाश

Pooja Khedkar IAS पद गमावणार, प्रकरणावर PMO ची बारीक नजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss