Tuesday, July 2, 2024

Latest Posts

मुंबईसह किनारपट्टी भागांत पुढचे चार दिवस पावसाची संततधार सुरु

सध्या सगळीकडे मान्सूनची प्रतिक्षा असतानाच संपूर्ण राज्यात मान्सून हा दाखल झाला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे.

Mumbai Mansoon Update : सध्या सगळीकडे मान्सूनची प्रतिक्षा असतानाच संपूर्ण राज्यात मान्सून हा दाखल झाला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुंबईमध्ये देखील पावसाने हळू हळू हजेरी लावायला सुरुवात ही केली आहे. अनेक भागांत पावसाची संततधार (Rain Updates) पाहायला मिळत आहे. मुंबईत कालपासूनच बुधवार दिनांक १९ जून पासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही भागांत आजही पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. अशातच हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

यंदा मान्सून मुंबईत गेल्यावर्षीपेक्षा लवकर पोहोचला होता. मात्र, सुरुवातीचा एक दिवस झालेला पाऊस वगळता मुंबईवर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील उकाडा (Mumbai Temperature) अजूनही कायम असून मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दांडी मारुन बसलेल्या पाऊस अखेर मुंबईत परतल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली होती. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाची संततधार पाहायला मिळेल. त्यासाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा जोर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्यानं पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली होती, मात्र आता मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पाऊसाची रिमझिम लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये ३८, डहाणूत ५८, हर्णेत ११, सांताक्रुजमध्ये ६ आणि रत्नागिरीत १४ मिमी पाऊस पडला आहे.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss