Coastal Road,मुंबईची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोड होणार सुरु..

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका(Municipal Corporation) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा प्रकल्प सुरु केला आहे. सागरी मार्ग, भुयारी मार्ग, खाडी पूल, सागरी पूल, उड्डाणपूल विकसित करून वाहतूक कोंडी कमी केली जाणार आहे.

Coastal Road,मुंबईची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोड होणार सुरु..

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका(Municipal Corporation) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा प्रकल्प सुरु केला आहे. सागरी मार्ग, भुयारी मार्ग, खाडी पूल, सागरी पूल, उड्डाणपूल विकसित करून वाहतूक कोंडी कमी केली जाणार आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला सागरी किनाऱ्यालगत कोस्टल रोड विकसित केला जात आहे. मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पास तितकाच खर्च झाला आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

हा कोस्टल रोड १ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. येत्या १५ मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन होणार आहे. एका भोगद्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मरीन ड्राईव्ह (Marine drive ) ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. मुंबईकरांना या सागरी मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.मूंबईची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

मुंबईचा कोस्टल रोड (mumbai Coastal Road)प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग व उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली पर्यंतचा हा प्रक्लप जवळपास २९ किलोमीटरचा आहे. दक्षिण भागातील कोस्टल रोड हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत संपतो. सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, दोन्ही बोगदे २ किलोमीटरचे आहेत म्हणजेच एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे या बोगद्यांचे तीन प्रकार आहेत. मावळा नामक टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२७०० कोटी रुपये खर्च केला आहे. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे तसेच दुसऱ्या बोगदाचे काम ९१ टक्के पूर्ण झाल आहे.

हे ही वाचा :

असदुद्दीन ओवेसी आणि भाजप हे खरे राम-श्याम, संजय राऊत यांनी दिले प्रत्युत्तर

Veer Savarkar Death Anniversary, सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घ्या त्यांचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version