Crime News : मुंबईत २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीकडून अटक

Crime News : मुंबईत २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीकडून अटक

मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० कोटी रुपयांचे तब्बल २.८०० ग्रॅम कोकेन जप्त केले असून ते बुटामध्ये लपवून आण्याच्या प्रयत्न हेतू होता. परंतु कोकेनची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीने अटक केली आहे. मरिंडा एस असे अटक करण्यात आलेल्या एका संशयित महिलेचे नाव आहे. मरिंडा आणि आणखी एक महिला दक्षिण आफ्रिकेवरून आल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या आकाराच्या आठ पॅकेटमधून हे कोकेन आणण्यात आले होते. तर यासाठी दोन जोड्यांच्या शूजमध्ये आणि दोन पर्समध्ये विशेष पोकळी तयार करून अतिशय काळजीपूर्वक हे कोकेन लपवले होते. परंतु, पोलिसांनी सतर्क राहून कोकेन तस्करीचा प्लान उधळून लावला.

हेही वाचा : 

Rohit Sharma Team India : रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वीच केली होती ‘ही’ मोठी भविष्यवाणी, ट्विट व्हायरल

मुंबईतील एनसीबी अधिकार्‍यांना माहिती मिळाली की, २० नोव्हेंबर रोजी इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबईला एक विमान येणार होते. यातून कोकेनची तस्करी करण्यात येत आहे. मिलालेल्या माहितीनुसार मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ मुंबई विमानतळावर धाव घेत संबंधित महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला. आणि अदीस अबाबाहून आलेले विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच त्या महिलेला पोलिसांच्या पथकाकडून अडवण्यात आले. यावेळी तिची झडती घेण्यात आली. त्यावेळी तिच्या साहित्यातून २.८०० किलो उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. हे कोकेन संशयास्पद वस्तूंमध्ये काळजीपूर्वक लपवून ठेवले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर मुंबईतील सर्वपक्षीय सदस्यांची बैठक

गेल्या दोन महिन्यापूर्वी ४.९ कोटींचे कोकेन जप्त केले जप्त

मुंबईत वारंवार अशा घटना घडत असतात. यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने ४९० ग्रॅम कोकेन घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत ४.९कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलं आहे. महिला प्रवाशाने तिच्या सँडलमध्ये बनवलेल्या एका खास छिद्रात कोकेन लपवून ठेवल्याचे सांगण्यात आले. प्रवाशी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर मुंबईतील सर्वपक्षीय सदस्यांची बैठक

Exit mobile version