विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस खेळणार मोठी खेळी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार रिंगणात?

राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका या पार पडला आणि त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे राज्यातील विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपले आहेत

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस खेळणार मोठी खेळी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार रिंगणात?

राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका या पार पडला आणि त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे राज्यातील विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपले आहेत त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला देखील सुरुवात झाली आहे अद्याप विधानसभा निवडणुकांची कोणतीही तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही परंतु पक्षांनी मात्र त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष ऍक्शन मोड मध्ये आले आहेत यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या सर्वच पक्षांकडून आमदारांची चाचपणी सुरू आहे. अश्यातच आता काँग्रेस पक्ष मोठी खेळी खेळणार याबाबतच्या चर्चाना मात्र चांगलंच उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा येत्या १० दिवसांमध्ये पूर्ण होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबत देखील महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप समोर आलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईतील ६ पैकी ४ जागा जिंकत महायुतीला धक्का दिला होता. मुंबई उत्तर मध्य लोकसा मतदारसंघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकम यांना पराभूत केलं होतं. याच मतदारसंघात वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व हे दोन मतदारसंघ येतात. यापैकी वांद्रे पश्चिममध्ये काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आशिष शेलार आहेत. आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त अशी निवडणूक होणार का हे जागावाटप झाल्यानंत स्पष्ट होईल.

वांद्रे पूर्व जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. आता, झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळला होता. आता राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना यावेळी मोठी आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर मविआला ही जागा जिंकण्याची आशा आहे. मात्र, वांद्रे पूर्वची जागा विधानसभेला आपल्या पक्षाला मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसचा विचार आहे. प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. प्रिया दत्त यांचा या मतदारसंघात प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. प्रिया दत्त यांना उमेदवारी जिंकवून ही जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे काँग्रेसला वांद्रे पश्चिम मतदारसंघ दिल्यास वांद्रे पूर्वची जागा शिवसेना ठाकरे गटाला द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लोकसभेचा कल पाहता आशिष शेलार आणि प्रिया दत्त यांच्यात जोरदार लढत होऊ शकते.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version