spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

The Kashmir Files चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे अनुपम खेर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला

‘द काश्मीर फाइल्स’वरून देशात पुन्हा एकदा गदारोळ सुरू आहे. अनेकांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खुले आव्हान दिले आहे. काश्मीर फाइल्सचा एक संवाद किंवा एकही सीन खोटा निघाला तर मी चित्रपट बनवणे बंद करेन, असे ते म्हणाले.

खरंतर, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी सोमवारी चित्रपट महोत्सवादरम्यान याला अश्लील आणि अपप्रचार करणारा चित्रपट म्हटले. तेव्हापासून या चित्रपटाबाबत वाद सुरू आहे. गोव्यातील ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप समारंभात लॅपिड यांनी हे विधान केले. अशा परिस्थितीत या वादाच्या भोवऱ्यात अनुपम खेर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

हेही वाचा : 

‘या कोणत्याही कटात मनसे नेत्याचा सहभाग नव्हता’, जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटची पुन्हा चर्चा

आज बुधवारी सकाळी अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केली. या फोटोंमध्ये अनुपम खेर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बापाच्या दर्शनासाठी उपस्थित असल्याचे दिसत आहे. अनुपम खेर यांनी हातात फोटो फ्रेम धरली आहे आणि त्‍यांच्‍या आगामी ‘द सिग्नेचर’ या चित्रपटाचे पोस्टर देखील आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे की- ‘सबकी सलमती के लिए दुआ मांगी है. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे गोध दिग्दर्शित माझ्या आगामी ‘द सिग्नेचर’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री महिमा चौधरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

नादव लॅपिड यांचे विधान

IFFI २०२२ चा समारोप २८ नोव्हेंबर रोजी झाला. गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ज्युरीचा भाग असलेले इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी सांगितले की, द काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर त्यांना हा चित्रपट प्रचारावर आधारित असभ्य चित्रपट असल्याचे वाटले. चित्रपट निर्मात्याचे हे विधान समोर आल्यानंतर अनुपम खेर म्हणाले, देव त्यांना सद्बुद्धी देवो.

रविना टंडनने येणार ‘या’ कृत्यामुळे येणार अडचणीत

संतप्त विवेक अग्निहोत्री

‘अशी विधाने माझ्यासाठी नवीन नाहीत. तुकडे-तुकडे टोळ्या, दहशतवादी संघटना अशीच चर्चा सुरू आहे. भारत सरकारने आयोजित केलेल्या महोत्सवात दहशतवाद्यांच्या कथनाचे चित्रपट निर्मात्याने समर्थन केले आहे. आजही तिथे निवडकपणे माणसे मारली जातात.हा अश्लील आणि अपप्रचार आहे का? द काश्मीर फाईल्समधला एकही सीन आणि संवाद खोटा आहे हे जर कोणी विचारवंत सिद्ध करू शकला तर मी चित्रपट बनवणे बंद करेन.

Zombie virus शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी, ४८ हजार वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस’ पुन्हा जिवंत

Latest Posts

Don't Miss