दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

गुरुवारी दि २६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दादर पूर्व परिसरात आग लागण्याची घटना घडलीआहे. दादर पूर्व (Dadar East) या भागातील एका रहिवासी इमारतीत आग (Building Fire) लागल्याची घटना घडली.

दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

गुरुवारी दि २६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दादर पूर्व परिसरात आग लागण्याची घटना घडलीआहे. दादर पूर्व (Dadar East) या भागातील एका रहिवासी इमारतीत आग (Building Fire) लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश (Success in Getting The Fire Under Control) मिळालं आहे. तसेच ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होते. त्यानंतर चार तासाहून अधिक वेळानंतर आग अटोक्यात आली आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळत आहे. परंतु सुदैवाने या आगीत कोणाची जीवितहानी हि झालेली नाही. दरम्यान इमारतीमध्ये लागलेली आग तर विझली परंतु या आगीवरुन आता महाराष्ट्रातील राजकारण मात्र तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आगल्याचा आरोप भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे.

दादर पूर्व भागातील आर. ए. रेसिडन्सी या रहिवासी इमारतीला काल रात्रीच्या सुमारास आग लागली होती. ४२ व्या मजल्यावर ही आग लागली होती. या इमारतीची लिफ्ट बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला. त्यामुळं आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता. तसेच ज्या भागातील इमारतीला आग लागली होती ते भागातील अग्निशामक यंत्रणा हि काम करत न्हवती. आग विझवण्यासाठी १६ फायर इंजिन, ४ जंबो टँकर आणि १ क्रेन दाखल झाले होते. अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आतल्यामुले राजकीय वातावरण हे तापलं आहे. कारण भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी आरोप केले आहेत.

हा सर्व बीएमसीचा निष्काळजीपणा आहे. मुंबई महापालिका जर ४४ ते ५५ मजल्यांच्या इमारती बांधायला परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला देखील तितक्याच तयारीची गरज आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाकडे आग विझवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व तंत्र विकसित करणं आवश्यक आहे, असं कालिदास कोळंबकर म्हणाले. तसेच हि आग ४२व्या मजल्यावर लागली होती त्यामुळे ही आग नियंत्रणात आणायला तब्बल २ तासांहून अधिक वेळ लागला आहे. आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये नुकतीच नवीन सोसायटी बनली होती. परंतु आरए रेसिडेन्सी टॉवरच्या ए विंगमधील अग्निशमन यंत्रणा (Fire Fighting System) काम करत नसल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात चिकन खाताय तर बनवून बघा ‘Kashmiri Rogan Josh’

एलॉन मस्क यांच ट्विटरवरील नाव बदलले, आता मस्क ‘या’ नावाने वापरतात ट्विटर

अमृता फडणवीसांची चाहत्यांना भेट, प्रजासत्ताक दिनानिमित्त लाँच केले नवे गाणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version