Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला लागलं गालबोट!, मुंबईत थरावरुन कोसळून तब्बल १५ गोविंदा जखमी…

मुंबईत सर्वत्र जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे.

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला लागलं गालबोट!, मुंबईत थरावरुन कोसळून तब्बल १५ गोविंदा जखमी…

Dahi Handi 2024 Celebration : मुंबई म्हंटल की सर्व सण उत्सव यांचे माहेरघर आहे. येथे प्रत्येक जातीतील, पंथातील सण खूप उत्साहात, आनंदात साजरे केले जातात. त्यात दहीकाला किंवा दहीहंडी सारखा उत्सव म्हणजे सोन्याहून पिवळे क्षण असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे आणि मुंबईला ओळखले जाते. दहीकाला म्हणजे आबालवृद्धांच्या आवडीचा असा हा सण. हा केवळ सण नव्हे तर एक मोठा उत्सव असतो. हा उत्सव प्रत्येक जण तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. अश्यातच आता या सणाला स्पर्धेचे रूप हे आले आहे. सकाळपासूनच मुंबापुरीत ढाकुमाकुम, ढाकुमाकुम, स्वर कानावर ऐकायला मिळत आहेत. विविध गोविंदा पथकं आपल्या मंडळाची टी-शर्ट घालून दहीहंडी फोडण्यासाठी निघाली आहेत. मानवी मनोरे रचताना ‘बोल बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत गोविंदा आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतायत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपये पारितोषिक असलेल्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाण्यात जवळपास १३५४ दहीहंड्यांच आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईत सर्वत्र जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत १५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत विविध पथकातील १५ गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात १, नायर रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात २, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये १, पोद्दारमध्ये ४, राजावाडीमध्ये १, एमटी अगरवार रुग्णालयात १ आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या २०० वर पोहचली आहे. दरम्यान मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

Dahihandi 2024 special : ठाण्यातील हंडयां पाहायच्यात आहेत ? ; मग या.. पाहुयात ही बक्षिसांची लयलूट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version