NCP Chief Sharad Pawar अज्ञात व्यक्तीकडून पवारांना जीवे मारण्याची धमकी

NCP Chief Sharad Pawar अज्ञात व्यक्तीकडून पवारांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारणाची धमकी आली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

Samruddhi Mahamarg औरंगाबादहून नागपूरला जाणारी लाल परी ‘या’ तारखेपासून धावणार समृद्धी महामार्गावर

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा काल (सोमवारी, १२ डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. या व्यक्तीनं फोन करून पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती. अशी माहिती समोर येत आहे.

Agnipath Scheme ही योजना ऐच्छिक आहे, ज्यांना समस्या आहेत त्यांनी सहभागी होऊ नये, ‘अग्निपथ’बाबत न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर आज (मंगळवारी) एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या अज्ञात इसमानं शरद पवारांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Pune News महापुरुषांच्या अवमानकारक विधानाविरोधात पुणे बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Exit mobile version