मुंबईत Corona च्या रुग्णात घट; सोमवारी शून्य रुग्णांची झाली नोंद

कोरोना हा शब्द देखील ऐकला तरी धडकीच भरते. मागील तीन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात धुडगूस घातला होता. मागचे दोन वर्षे प्रत्येकाला घरी बसून काढावे लागले. तसेच २०२२ या वर्षांपासून कोरोनामुळे बदल करण्यात आलेले सर्व कामकाज पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे

मुंबईत Corona च्या रुग्णात घट; सोमवारी शून्य रुग्णांची झाली नोंद

कोरोना हा शब्द देखील ऐकला तरी धडकीच भरते. मागील तीन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात धुडगूस घातला होता. मागचे दोन वर्षे प्रत्येकाला घरी बसून काढावे लागले. तसेच २०२२ या वर्षांपासून कोरोनामुळे बदल करण्यात आलेले सर्व कामकाज पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे. कोरोनाने मुंबईकरांना भरपूर हैराण केले होते मात्र आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये तब्बल चार महिन्यानंतर शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात कोरोना बाधितांची शून्य नोंद ही या वर्षात पाच वेळा झाली आहे. मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाही करून रुग्णाची नोंद झालेली नाही. १३ फेब्रुवारी नंतर कोरोना रुग्णाची संख्या ही शून्यच आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये पॉझिटिव्ह (Positive) रुग्णांची संख्या ही सुद्धा शून्यच आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे ३६ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण ११६३९१३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ११४४१०४ इतक्या कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबई मध्ये आतापर्यंत १२७७३ कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने २०२० या वर्षी संपूर्ण जगभरात हाहाकार मांडला होता. मार्च २०२० मध्ये देशात सर्वत्र कोरोना पसरला. कोरोनाचा शिरकाव सर्वत्र झाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या प्रचंड वाढली होती. या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मुंबई मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ हजार पर्यंत पोहोचली होती. त्याचबरोबर मृत्यू दर देखील झपाट्याने वाढत होता. यावेळी मृत्यू होण्याची संख्या १००च्या घरात पोहोचली होती. मात्र यावेळी हार न मानता सरकारने व मुंबई महानगर पालिकेने अनेक उपक्रम राबविले. मुंबई मध्ये कोरोनाच्या तिन्ही लाटांना पळविण्यामागे मुंबई महानगर पालिकेचा महत्वाचा वाटा आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा उसळल्या असून ओमायक्राॅन बीएफ 7 (Omicron BF7), एक्सबीबी (XBB), एक्सबीबी 1.5 (XBB 1.5) असे नवनवीन व्हेरिएंटचा शिरकाव मुंबईत झाला.

मुंबई महानगर पालिकेने लसीकरणाच्या वेळी देखील अनेक उपक्रम हाती घेतले होते. जेष्ठ नागरिकांना मुंबई महानगरपालिकेकडून मोफत लस देण्यात आली होती. तसेच भारत बायोटेकची इन्कॉव्हक (Inconvec) लस नाकावाटे दिली जाणार असून ही लस मुंबई महानगर पालिकेच्या २४ वोर्ड मधील निवडक केंद्रावत उपलब्ध करण्यात आली आहे. इंकोव्हिक ही जगातील पहिली नाकावाटे दिली जाणारी लस आहे. ही लस घेण्यासाठी करण्यात येणारी नोंद केंद्रावरच केली जाईल. तसेच लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीमध्येच सुरु राहील.

हे ही वाचा:

अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी PM Modi यांनी मानले काँग्रेसचे आभार!

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version