मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच गोरेगांव ते मुलुंड जोडरस्ता (Goregaon-Mulund Link Road) अंतर्गत बोगद्याचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच गोरेगांव ते मुलुंड जोडरस्ता (Goregaon-Mulund Link Road) अंतर्गत बोगद्याचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंडजोड रस्ता हा १२. २० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. ऑक्टोबर २०२३ पासून प्रत्यक्षात या रोडच्या कामकाजाला सुरूवात होईल.

या अंतर्गत गोरेगाव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडापर्यंत जुळा भूमिगत बोगदा (प्रत्येकी ४.७०) किलोमीटर अंतर आणि चित्रनगरी परिसरातील १.६ किमी लांब पेटी बोगद्यासह बांधकामासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. यामध्ये सर्वात कमी किंमतीची बोली जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी लावली आहे. हा बोगदा सुमारे साडेचार वर्षांमध्ये पूर्ण होणार असून ऑक्टोबर २०२३ पासून या बोगद्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता, गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता अंतर्गत जुळा बोगदा बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रकाशित केल्या होत्या. जेकुमार-एनसीसी जेव्ही (Jekumar-NCC JV), एल ऍण्ड टी (L&T) आणि ऍफकॉन्स (Afcons) या तीन कंपन्या अंतिम स्पर्धेत होत्या. यातील जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी सर्वात कमी किंमतीची बोली लावली आहे. ही बोली ६ हजार ३०१ कोटी रुपयांची आहे. बोगद्याच्या निर्मितीचे काम देखील आता लवकरच सुरु करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Amruta Deshmukh-Prasad Jawade यांनी दिली प्रेमाची कबुली, ‘या’ तारखेला करणार लग्न

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version