spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी! कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण,मध्य रेल्वेवरील लोकल पुन्हा ड्यूटीवर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद स्टेशन दरम्यानच्या कर्नाक उड्डाणपुलाच्या तोडकामासा काल शनिवारी रात्रीपासून सुरू झाले आहे. त्यामुळे रात्रीपासूनच २७ तासांचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला होता. हा १५४ वर्ष जुना पूल धोकादायक ठरल्याने उड्डाणपुलाच्या तोडकामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आला होता. त्यामुळे या काळात सीएसटीएमहून भायखळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि भायखळ्याहून सीएसटीएमकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण आता कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : 

Shivaji Maharaj : भाजपला शिवाजी महाराज का खुपतात? अमोल कोल्हेंचा भाजपला सवाल

गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूला मोठ-मोठ्या क्रेन्स लावून पुलाचा लोखंडी साचा बाजूला काढण्यात आला. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सध्या ८० टक्के काम पूर्ण झालंय. पूल पाडल्यानंतर ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या पूल पाडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेचे शेकडो कर्मचारी ट्रॅकवर उतरले. इंजिनिअरची टीम युद्ध पातळीवर ओव्हरहेड वायर्स जोडण्याचे काम करत आहे. तसेच उर्वरित २० टक्के काम पुढच्या अर्ध्या तासांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.

उद्योगपती मुकेश अंबानी बनले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने २७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये १७ तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच हार्बर लाईनची लोकल सेवा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच रात्री ८ वाजता सुरु केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यासाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यासाठी मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

India vs New Zealand T-20: मध्ये सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट कामगिरी कायम

Latest Posts

Don't Miss