शरद पवार यांच्या समर्थनात निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून मुंबईतील प्रदेश पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे.

शरद पवार यांच्या समर्थनात निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने

काल दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ही घडली आहे. केंद्रीय निवडणूक योगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने सुनावणी चालली. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. या निकालानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर आज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी शरद पवार गटाकडून निदर्शने करण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून मुंबईतील प्रदेश पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार अशा घोषणा शरद पवार साहेब यांचे समर्थक कार्यकर्ते आंदोलन दरम्यान देत आहे. मुंबई विभागातील कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयासमोर अजित पवार यांच्या फोटोला काळं फासत, विरोधात घोषणा देत आंदोलन केले आहे. ‘जो नाही झाला काकाचा, तो काय होणार जनतेचा’, ‘जो नाही झाला बहिणीचा, तो काय होणार जनतेचा’, ‘जो नाही झाला काकींचा, तो काय होणार जनतेचा’ अशा घोषणा अजित पवार यांच्या नावाने देण्यात येत आहे, तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात देखील आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह (Symbol) आणि पक्ष (Party) अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा (New Party Name) विचार सुरू आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version