spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH च्या वेळी Devendra Fadnavis यांनी केल्या भावना व्यक्त..

काल (२० जुलै) ला सर्वांना ज्याची अतिशय तीव्रतेने प्रतीक्षा होती. गेले १ ते २ वर्ष ज्या सिनेमाची आपण वाट पाहत होतो. असा धर्मवीर-२ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. कालच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज, कलाकार मान्यवर उपस्थित होते. अगदी अशोक सराफांपासून ते हिंदी सिनेमा सृष्टीतले सलमान खान इथपर्यंतचे सर्व कलाकारगण उपस्थित होते. त्यासोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर यांसारखे अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले होते.

धर्मवीर २ सिनेमाचा ट्रेलरचे अनावरण अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे हे उपस्थित होते. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी बोलताना प्रवीण तरडे यांनी तिसऱ्या भागाचेही संकेत दिले आहे. मला वाटत नाही की, भाग दोन झाल्यावर ही गोष्ट संपेल, असं म्हणत त्यांनी तिसऱ्या भागाचे संकेत दिले आहे. यानंतर देवेंद्र फडणविसांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनाही सिनेमा काढायचा असल्याचे भावना बोलून दाखवली.

या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये काही वेळ हशा पिकल्याचेही पहायला मिळाले. चित्रपटाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, धर्मवीर २ हा चित्रपट कुठपर्यत गेला आहे हे माहिती नाही. मात्र शिंदे साहेब या चित्रपटात आमची देखील भूमिका असायला हवी होती, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पहायला मिळाले. तसेच यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, खरंतर मला देखील एक चित्रपट काढायचा आहे. मात्र माझ्या सिनेमाला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर मी तो सिनेमा काढणार आहे. मात्र आज मला आनंद आहे. कारण धर्मवीर २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट कधी बघायला मिळेल याची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा:

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH: राजकारणी माणसावर पिक्चर लिहू शकता हे मी पहिल्यांदाच बघितलं…अशोक सराफ

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH : धर्मवीर ट्रेलर लॉन्चवेळी क्षितिज दाते म्हणाला, प्रवीण तरडे यांच्यावर सरस्वती प्रसन्न…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss