Thursday, July 4, 2024

Latest Posts

पुर्नविकासाला विरोध नाही, धारावीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे: Aditya Thackeray

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज (शनिवार, २९ मे) माध्यमांशी संवाद सादहत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल (Dharavi Redevelopment Project) भाष्य केले.

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज (शनिवार, २९ मे) माध्यमांशी संवाद सादहत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल (Dharavi Redevelopment Project) भाष्य केले. यावेळी त्यांनी, “पुर्नविकासाला कोणाचाही विरोध नाही. धारावीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे,” असे वक्तव्य केले आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “पुनर्विकास झाला पाहिजे. विकास करताना तुम्ही सवलती किती देत आहे. आणि ते मुंबईला खाऊन टाकतील याला आमचा विरोध आहे. पुर्नविकासाला कोणाचाही विरोध नाही. आम्ही देखील त्याला वेग दिला होता. जे काम आधीच्या सरकारने रखडवलं होतं. आम्ही हाच विचार करत होतो की धारावीकरांचा विकास कसा होईल. या सरकार मध्ये फक्त दुसऱ्यांचा विकास होत आहे. धारावीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. एक ते दीड लाख फॅमिली अपात्र होण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो जीआर काढला होता मुलुंड असेल कुर्ला संस्थानिकांचा विरोध असताना देखील तो जीआर लादायचा. धारावीकरांना मूळ धारावीतच घर भेटली पाहिजे. मात्र ते होत नाहीत याच गोष्टीला आमचा विरोध आहे. याचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे. मिहीर कोटेचा बोलले होते की आम्ही जीआर रद्द करू. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर तो जीआर रद्द झाला नाही. हे लोक मुंबई द्वेष्ट आहेत. खोटं बोलणारी लोक आहे. या भाजपच मन महाराष्ट्र विरोधी आहे,” असते ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पावरून बोलताना ते म्हणाले, “गाजर वाटप चा कार्यक्रम सर्वीकडे जोरात सुरू आहे. मात्र मुंबईला काय मिळालं पुण्याला काय मिळालं? पार्लमेंट चा एक अॅक्ट आहे FRMB हा कायदा त्यांनी मोडला आहे. ३ टक्के तुमचं कर्ज जीडीपीच्या पुढे जाऊ शकत नाही. या सर्व गोष्टींची चिरफाड गाजर बजेटची लोकच करत आहे. यांना एवढ्या वर्षात शेतकरी आणि बहिणी आठवले नाही. हेच भाजप सरकार जेव्हा शेतकरी दिल्लीत मोर्चा घेऊन जातो तेव्हा त्यांना अतिरेकी बोलले. दीड हजार रुपयांमध्ये कोणाचं काय भागणार आहे. एवढा खराब पराभव होणार आहे. त्यामुळे काहीतरी करायचंय म्हणून करताय

राज्य सरकारवर टीका करत ते म्हणाले, “गळती कुठे कुठे सुरू नाही आहे. हे सरकार आता डबल गळती सरकार सुरू झाला आहे. मंदीरा मध्ये देखील त्यांनी घोळ केला आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यां वर बोलायला गेले त्यांना देखील बोलू दिल नाही. आमचं सरकार असतं तर आम्ही अटल सेतू सुरू केला असता ते पण बिना खड्ड्याचा. वरळी-शिवडी रस्त्याच काम आमच सरकार असताना ५७ % झालं होतं. आता फक्त ५० % झाला आहे म्हणजे फक्त दोन वर्षात ७ टक्के काम झालं.”

हे ही वाचा:

Uddhav Thackeray मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? Sharad Pawar यांचं थेट उत्तर

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss