spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मान्यवरांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांची वर्षा निवासस्थानी उपस्थिती 

केंद्रीय संसदीय कामकाज तसेच अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून विराजमान झालेल्या श्री गणेशाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांचे शाल, श्रीफळ आणि श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसेच वेळात वेळ काढून त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान वर्षा बंगल्यावर श्री गणेशाच्या दर्शनासाठी आल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी खासदार राहुल शेवाळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सचिन तेंडुलकर यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर म्हणून सुपरिचित असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज वर्षा निवासस्थानी येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन सन्मानित केले. यानंतर खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर याप्रसंगी चर्चा झाली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी जाणून घेतली.

हे ही वाचा:

Mukhyamantri Yojana doot साठी अर्ज करण्याची मुदत वाढली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत ?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss