spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, मविआच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल

आज निघणाऱ्या सत्ताधारी आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi Morcha) दोन मोर्चांनी राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस(BJP) सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा (HallaBol Morcha) एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी ‘मांगो आंदोलन’ केले जाणार आहे. हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघणार असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे.

माविआच्या आज सकाळी १०.३० वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.

हेही वाचा : 

आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चाच्या सर्वत्र डंका, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शन

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

प्रवाश्यांची या पर्यायी मार्गांचा करा 

मुंबई पोलिसांच्या सुचनेनुसार, दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा-
गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड)

वाहन चालकांना सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करता येईल, भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड, नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड

वजन कमी करण्यासाठी या पदार्थाचा वापर करू शकता

संत सावता रोड- मुस्तफा बाजार- रे रोड- स्लीप रोड- बॅरिस्टर नाथपै रोड- पी डी मेलो रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गाचा वापर करत दक्षिण मुंबईतील इच्छित स्थळी जाता येईल.

या महामोर्चाला पोलिसांनी (Mumbai Police) परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी (Maha vikas Aghadi) चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.

सुषमा अंधारेंनी दिलं कीर्तनकार सुनिता अंधाळेंना प्रतिउत्तर

Latest Posts

Don't Miss