spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mega Block, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिम्मित उद्या हार्बर लाईनवर लोकल राहणार सुरळीत

उद्या दिनांक 16 एप्रिल रोजी हार्बर लाईनवरील खारघर येथे महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उद्या दिनांक 16 एप्रिल रोजी हार्बर लाईनवरील खारघर येथे महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिम्मित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः उद्या खारमध्ये उपथित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी जवळपास 15 ते 20 लाख समर्थक येणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या हार्बर लाईनवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर उद्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.

रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block) रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.

तसेच हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक हा रद्द केला असला तरीही सेंट्रल लाईनवरील मेगाब्लॉक हा राहणार आहे. रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

 

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.

हे ही वाचा : 

सहा वर्षात उत्तर प्रदेशमध्ये झालेत १०,७१५ एन्काऊंटर, योगींच्या कार्यशैलीने उत्तर प्रदेश ठरतोय उत्तम प्रदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी

अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss