spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत केले बदल

सत्तांतरानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दि १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे मोदींच्या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दि १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे मोदींच्या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्याशिवाय काही मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. घाटकोपर-वर्सोवा हि मेट्रो सेवा १ काही कावालधीसाठी बंद असणार आहे.

एकीकडे नरेंद्र मोदी हे येणार आहेत तर दुसरीकडे त्यांचा दौरा असलेल्या ठिकाणी विशेष बंदौबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेची चोख खबरदारी घेतली जात आहे. दि. १९ जानेवारी रोजी बीकेसी पीएस, अंधेरी पीएस, मेघवाडी पीएस, जोगेश्वरी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ड्रोन आणि मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १९ जानेवारी राजी दुपारी १२:०१ ते रात्री ११ पर्यंत लागू राहील. त्याच बरोबर उद्या जर का नागरिकांना मेट्रोने प्रवास करायचा असेल तर त्यांनी मेट्रोच्या वेळा सुद्धा आवर्जून बघितल्या पाहिजे. कारण घाटकोपर आणि अंधेरी यांना जोडणारी मेट्रो १ हि तब्बल २ तासांसाठी बंद राहणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून उद्या संध्याकाळी ५.४५ ते ७.३० या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच उद्या (गुरुवारी) तुम्हाला तुमची फ्लाइट चुकवायची नसेल तर तुम्हाला विमानतळावर लवकर जावं लागणार आहे. कारण व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईच्या रस्त्यावर दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत जड वाहतूक असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ जोगेश्वरी लिंक रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस रोड आणि इतर रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळावरून उड्डाण घेण्याचा विचार करत असाल तर कोणतीही रहदारी टाळण्यासाठी लवकर पोहोचाव लागेल.

तसेच बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच ५.३० ते- ५.४५ या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतुक संथ गतीने सुरू असेल. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असं मुंबई वाहतूक पोलीसांनी ट्विट करून सांगितलं आहे. त्याशिवाय नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहितीच प्रमाण मानावी. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

हे ही वाचा:

शुभमन गिलने ठोकली षटकारांची हॅट्रिक, न्यूझीलँड संघासमोर ठेवले ३५० धावांचे लक्ष्य

शाळेच्या पिकनिकमध्ये केली राज ठाकरेंनी एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss