spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली मोठी कारवाई

देशावर कोरोना सारख्या महामारीचे सावट आले असताना उद्धव तावरे यांच्या नेतृत्वाखाली कोविद काळात महत्वाची खबरदारी घेण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी देखील बजावली होती.

देशावर कोरोना सारख्या महामारीचे सावट आले असताना उद्धव तावरे यांच्या नेतृत्वाखाली कोविद काळात महत्वाची खबरदारी घेण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी देखील बजावली होती. मात्र आता त्याचं कोरोना काळातील मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचंही सांगितलं जात आहे. पाटकर यांना आता कोर्टात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

कोरोना काळात लाईफलाईन कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केला होता. हा १०० कोटींचा घोटाळा होता. ही कंपनी सुजीत पाटकर यांची होती. वाढीव दरात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कामाचा अनुभव नसतानाही लाईफलाइ कंपनीला टेंडर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.ईडीने आज सकाळीच सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. सुजीत पाटकर यांनी १०० कोटींचा घोटाळा केला होता, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

त्या प्रकरणाची ईडीने दखल घेऊन चौकशी केली होती. या प्रकरणी सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशीही केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती. त्यानतंर अखेर त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डॉ. किशोर बिचुले यांचाही या घोटाळ्याशी संबंध असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.सुजीत पाटकर यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण हेही ईडीच्या रडारवर होते. गेल्या महिन्यात ईडीने सुरज चव्हाण यांच्यासह 15 जणांच्या घरावर छापे मारले होते. यात महापालिकेच्या तत्काली अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचाही समावेश होता. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही धाड टाकली होती. चव्हाण यांची चौकशीही करण्यात आली होती. कोव्हिड घोटाळ्या संदर्भातच चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने पाटकर यांना अटक केल्यामुळे सुरज चव्हाण यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये प्रकरणामध्ये आता सर्वाच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये दिली ताकीद

अजित पवार यांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन , यंदा वाढदिवस…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss