spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे यांनी दिला आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला आणि दोन गट निर्माण झाले. एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा. गट निर्माण झाल्यापासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना धक्के देत आले आहेत. तर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात (Former corporator Santosh Kharat) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संतोष खरात हे वरळीतील (Worli) वॅार्ड क्रमांक १९५ मधील होते नगरसेवक होते. यानित्ताने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील पहिला नगरसेवक शिंदेंच्या गटात सामील झाला आहे. समाधान सरवणकर (Samadhan sarvankar), शीतल म्हात्रेंच्या (Sheetal Mhatre) पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा (Mumbra) आणि कळवा ( Kalwa) येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा:

Maharashtra MLC Election LIVE, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान, एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट…

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कर्जाचा बँकांकडून आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss