मुंबईत पावसाची एन्ट्री, अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना…

जून ते ऑक्टोबर हा मुंबईतील प्रसिद्ध मान्सून हंगाम आहे. ज्यामध्ये सतत पाऊस पडतो, विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात.नुकतेच मुंबईत मान्सूनचे (rainy season) आगमन झाले आहे.

मुंबईत पावसाची एन्ट्री, अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना…

जून ते ऑक्टोबर हा मुंबईतील प्रसिद्ध मान्सून हंगाम आहे. ज्यामध्ये सतत पाऊस पडतो, विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात.नुकतेच मुंबईत मान्सूनचे (rainy season) आगमन झाले आहे.पाऊस आणि मुंबईचे एक वेगळेच नाते आहे. पाऊस पडला की मुबईतल्या समस्या वाढल्या हे तर ठरलेलच अशीच एक पावसामुळेची समस्या मुंबईत उद्भवली आहे.पाऊस आला की मुंबईची तुंबई व्हायला फारसा वेळ लागत नाही.पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे.तसेच अनेक जागी पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचे बोलले जात आहे.

आता या पावसामुळे तीन दिवसात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचं निधन झाले आहे . तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, मुंबईतील अनेक भागात पाणी साचले(accumulated Water )असून, वाहतूक कोंडीही (Traffic congestion)झाली आहे. विद्याविहार आणि विले पार्ले येथे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती. तर गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये (Manhole) पाण्याचा निचरा (Drainage of water)करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे .पाऊस आणि मुंबईतील समस्या सध्या चालूच आहेत.

कालच दिनांक २५ जून रोजी मुंबईच्या विद्याविहार मधील ४० वर्ष जुन्या दुमजली इमारतीचा भाग कोसळला होता. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. यावेळी ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. २० तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला (fire brigade)यश आले. मात्र उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला होता . अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला (NDRF) यश आले होते .

रविवार विलेपार्ले परिसरातही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे . रविवारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळलाअसून यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू (death)झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णलयात (Kapoor hospital) दाखल करण्यात आले आहे.६५ वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि ७० वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू (death)झाला आहे.

हे ही वाचा:

Squid Game 2 चा टिझर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल… ‘या’ दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ!

राशिभविष्य,१९ जून २०२३,आज तुम्ही बरेच मजबूत असाल…

UP आणि Bihar मध्ये १०० हुन अधिक जणांचा मृत्यू, तर ४०० हुन अधिक जणांवर उपचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version