EXCLUSIVE, भूपेंद्र पटेलांच्या मुलाला ब्रेनस्ट्रोक, एअरलिफ्टने मुंबईत आणण्यासाठी शिंदेंची कार्यकर्त्यासारखी धावपळ

शहरापासून खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशासकीय आणि व्यक्तिगत पातळीवरही राबत असल्याचं आपण अनुभवत असतो.

EXCLUSIVE, भूपेंद्र पटेलांच्या मुलाला ब्रेनस्ट्रोक, एअरलिफ्टने मुंबईत आणण्यासाठी शिंदेंची कार्यकर्त्यासारखी धावपळ

शहरापासून खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशासकीय आणि व्यक्तिगत पातळीवरही राबत असल्याचं आपण अनुभवत असतो. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजशिष्टाचार दूर करून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मित्राच्या मुलाचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरी ‘कार्यकर्ता’ ही ओळख विसरलेलो नाही याची जणू प्रचितीच आणून दिली. त्यामुळेच अनुज भूपेंद्र पटेल याला वेळेत उपचार मिळवणे शक्य झाले.

महारष्ट्र दिनाच्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा एकुलता एक मुलगा अनुज जीवनमरणाची लढाई लढत होता. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलयांनी जामनगर मधील गुजरात दिनाचा कार्यक्रमालाही उपस्थित राहिले नाही. अनुज पटेल यांना रविवारी मेंदू विकार झाला. ३४ वर्षाच्या अनुज यांना अहमदाबादमधील सरखेज – गांधीनगर महामार्गावरील के डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयामध्ये अनुज वर २ तासांची शस्त्रक्रिया ही करण्यात आली मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी अनुज याला मुंबईत आणण्याचा निर्णय त्याची वडील आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुजा रुग्नालयाचे उच्च स्तरीय व्यवस्थापन आणि न्यूरोसर्जन डॉ. बी. के मिश्रा यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. १ मे हा महाराष्ट्र दिन असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे प्रचंड व्यस्त होते. तरीही आपले मित्र भूपेंद्र पटेल यांच्या मुलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंग जंग पछाडत पोलीस व्यवस्थेसह आरोग्य व्यवस्था ही वाऱ्याच्या वेगाने कामाला लावली. सोमवारी ११ वाजून ४५ मिनिटांनी अनुजला घेऊन एअर ऍम्ब्युलन्स मुंबईत दखल झाली. त्यांनतर अवघ्या १२ मिनिटात सोपस्कार उरकून अनुजला स्ट्रेचर वरून बाहेर आणण्यात आले. ११ वाजून ५८ मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या विशेष ताफासह ऍम्ब्युलन्स माहीमच्या हिंदुजा रुग्णालयाच्या दिशेने निघाली आणि फक्त ९ मिनिटात अनुजला घेऊन ऍम्ब्युलन्स हॉस्पिटल मध्ये पोहचली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने उपस्थित होते.

एअर ऍम्ब्युलन्सने अनुजला मुंबईत आणल्यावर परिमंडळ ८ चे उपायुक्त दिक्षीत गेडाम कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम यशस्वीरीत्या राबवली. महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात सुरु असलेल्या शोभायात्रा आणि वांद्र्यातील वज्रमूठ सभेसाठी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे मुंबई पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अनुजला घेऊन एअर ऍम्ब्युलन्स मुंबईच्या दिशेने निघाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर सतत संपर्कात होते. अनुज मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जातीने उपस्थित राहत त्याच्या उपचारांची व्यवस्था, शस्त्रक्रियेसाठीची तयारी याकडे लक्ष पुरवले होते. आपले महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम बाजूला सारत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना धीर देत मुंबईत कोणतीही गैरसोय होणार नाही यांची खात्री ही त्यांनी पटेल यांना दिली.

अनुजच्या एअर ऍम्ब्युलन्सबरोबरीनेच भूपेंद्र पटेल यांचे विशेष विमान मुंबईत दाखल झाले होते. त्यांनतर आणखी एका विमानाने अनुजच्या जवळच्या नातेवाईकांना मुंबईत आणण्यात आले. हिंदुजा रुग्णालयात अनुजवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुमारे ६ तास चालणाऱ्या या शस्त्रक्रियेच्या दरम्यान या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.

रविवारी आपल्या राहत्या घरी अनुजला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्याची प्रकृती नाजूक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद येथील शिलज येथील मन की बात या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकुलत्या एका मुलाला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईतील मदतीसाठी विचारणा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय झुल बाजूला सारत आपल्या मित्राच्या एकुलत्या एका मुलासाठी आपण मुख्यमंत्री नाही तर एक कौटुंबिक स्नेही असल्यासारखीच जातीने उपस्थित राहत धावपळ केली. इतकंच नव्हे तर प्रत्येक अर्ध्या तासाने अनुजच्या तब्येतीसंर्दभात माहिती आपल्याला पोहचवण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुजा प्रशासनाला दिले आहेत

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version