spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज होणार सुटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल (Arthur Road Jail) ते सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) दरम्यान बाईक रॅली (bike rally) काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रहेसचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात काल हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग आज मोकळा होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. १ नोव्हेंबर २०२१ ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

हे ही वाचा:

मणिरत्नमचा Ponniyin Selvan 2 नव्या वर्षाच्या ‘या’ तारखेला होणार रिलीज

तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत चार दिवस रंगणार Mandeshi Mahotsav

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss