spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घाटकोपर परिसरात अग्नितांडव, इमारतीला भीषण आग, १३ जण जखमी, तर ९० जणांना…

मुंबईतील घाटकोपर भागातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.

मुंबईतील घाटकोपर भागातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने सांगितले की, ९० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेत १३ जण जखमी झाले आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रमाबाई आंबेडकर मगसवर्गीय गृहनिर्माण संस्थेत ही आगीची घटना घडली आहे. या आगीमुळे झालेल्या धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. यावेळी तब्बल १३ जण गुदमरल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन दाते, अबिद शाह, अमिर इक्बाल खान अशी जखमींची नावे आहेत. यातील १२ जणांना अॅडमिट करण्यात आले असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. शांती सागर इमारतीत लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत साधारण एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली.

एक दिवसापूर्वी मुलुंड परिसरात असलेल्या ओपल अपार्टमेंटच्या ९व्या मजल्यावर आग लागली होती. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अग्निशमन विभागाने सांगितले की, ही आग दुपारी घडली. मुलुंडमधील एलबीएस रोडवरील भांडुप सोनापूर सिग्नल येथे असलेल्या ओपल अपार्टमेंटमध्ये १६ मजली अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर आग लागली. त्यांनी सांगितले की १६ मजली अपार्टमेंटच्या ९व्या मजल्यावर आग लागली, ज्यामध्ये एक एस.एम. आनंदी (६८) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर त्याला जवळच्या एम.टी. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss