Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग, आगीत ६ जणांचा मृत्यू

मुबंईत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात आगीचे सत्र चालूच आहे. मध्यरात्री तीन वाजता गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीच्या पार्किंगला आग लागली.

मुबंईत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात आगीचे सत्र चालूच आहे. मध्यरात्री तीन वाजता गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीच्या पार्किंगला आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. तसेच या इमारतीमधील ३० जण सुखरूप आहेत. तसेच मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे. सध्या तिकडे कुलिंगचे काम सुरु आहे. इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या आगीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीच्या पार्किंगला आग लागली. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. पार्किंगला लागलेली ही आग लेवल दोन असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. या आगीची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. तसेच या आगीत अडकलेल्या ३० पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर या आगीत १४ जण जखमी झाले आहेत. या आगीत अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या जळून खाक झालेल्या आहेत. जखमी झालेल्या नागरिकांना मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तळमजल्यावर वरील काही दुकाने जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री नागरिक झोपेत असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यास उशीर झाला त्यामुळे या आगीत मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटना स्थळी दाखल असलेल्या नागिकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री तीन वाजता मोठा ब्लास्ट झाल्याचा आवाज झाला. ब्लास्टच्या आवाजाने आम्ही सगळे जागे झालो. त्यानंतर खाली पाहिलं तर आग लागली होती. लगेच घरातील सर्वाना उठवून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडत असताना इमारतीतील सर्व सदनिकांच्या बेल वाजवल्या आणि लवकर घराबाहेर पडण्यास सांगितले. पार्किंगमध्ये भंगाराचे दुकान आणि जुने कपडे आले होते. त्यामुळेच आग लागली असावी अंदाज आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss