spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Petrol Diesel Price Today वर्ष अखेरीस देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरांतील इंधन दरातला बदल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. त्यानंतर काही दिवसांपासून पुन्हा एकदा घसरण सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे ग्राहकांना कोणताही दिलासा देण्यात आला नाही. देशातील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत.

हेही वाचा : 

Gujarat Election 2022 पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान सुरू , तब्बल ७८८ उमेदवारांचं भवितव्य जनतेच्या हाती

मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे, तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर असलं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी २२ मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, २२ मे २०२२ रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं.

राज्य सरकारे पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारतात

केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारही पेट्रोल आणि डिझेलवर कर लावतात. राज्यात, सरकार पेट्रोलवर १६.९७ टक्के किंवा १३.१४ रुपये प्रति लिटर, यापैकी जे जास्त असेल, आणि डिझेलवर १७.१५ टक्के किंवा १०.४१ पैसे प्रति लिटर, यापैकी जे जास्त असेल त्या दराने व्हॅट आकारते.

दुचाकी चालकांनो सावधान! आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे तपासा

राज्य स्तरावर आकारल्या जाणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना आर.एस.पी.कोड लिहा आणि ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवा.

अनेकांना रडवणाऱ्या कांद्याचे आणि त्याच्या रसाचे फायदे माहीत आहेत का ?

Latest Posts

Don't Miss