spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाडांना अटक

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. तर पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाड (Former Mayor of Panvel Jagdish Gaikwad) यांना पोलिासांनी अटक केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे. मुंबईतील चुन्नाभट्टी (Chunnabhatti) पोलिसांनी गायकवाड यांना अटक (arrested) केली आहे.

पनवेल नगरपालिकेतील माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial statement) केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड सोमवारी चुनाभट्टी परिसरात होते. त्यावेळी वंचितच्या कार्यकर्त्याने त्यांना रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये बचाबाची झाली. त्यानंतर गायकवाड यांनी या कार्यकर्त्याला मारहाण (beating) केली. कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली. गायकवाड यांनी यावेळी आपल्याला बंदुक (gun) दाखवून धमकावल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला असून याबाबत तपास करण्यात येत असल्याचे चुनाभट्टी पोलिसांनी सांगितले.

यावेळी जगदीश गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाकडे बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्त्यांनी जगदीश गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. या संपूर्ण घटनेनंतर चुनाभट्टी पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून जगदीश गायकवाड यांना तेथून हटवले. त्यानंतर जगदीश गायकवाड यांना चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आता गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलचे (Panvel) माजी महापौर जगदीश गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर पनवेलमधील कळंबोली पोलीस ठाण्यात जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

Oscar Awards 2023 RRRच्या नाटु नाटु गाण्याला मिळाले नामांकन, या डॉक्युमेंट्रीलाही मिळाले ऑस्करसाठी नामांकन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपली, ‘या’ प्रमुख मुद्यांवर झाली चर्चा

IND vs NZ 3rd ODI रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ३ वर्षांनंतर हिटमॅनने झळकावले ODI शतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss