Tuesday, September 24, 2024

Latest Posts

माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, वांद्रे-वरळी सी-लिंकवर …

माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या १९ वर्षीय मुलाच्या कारचा अपघात (Car accident) झाल्याची घटना घडली आहे.

माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या १९ वर्षीय मुलाच्या कारचा अपघात (Car accident) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाविरुद्ध वरळी पोलिसांनी (Worli Police) रॅश ड्रायव्हिंगचा (rash driving) गुन्हा दाखल केला आहे. मेहता यांचा मुलगा ताकषील नरेंद्र मेहता (Taksheel Narendra Mehta) याच्या LAMBORGHINI HURACAN COUPE MY15 कंपनीची कारचा (क्रमांक एम.एच. ०४ एच.क्यु. ०७११) वांद्रे वरळी सी-लिंकवर (Bandra Worli Sea -Link) अपघात झाला. वांद्रेहून दक्षिण मुंबईला (South Mumbai) जाताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस पडत असताना त्याची कार स्किड झाली आणि ती रस्त्यावरील बॅरिकेडवर आदळली. कारची एअर बॅग (Air bag) बाहेर येताच त्याच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, ताकषील नरेंद्र मेहतावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरळी पोलिसांनी त्याला नोटीस देऊन नंतर सोडून दिले आहे. ताकषील मेहता याची मेडिकल टेस्ट (Medical Test) देखील करण्यात आली. तो नशेत नसल्याचे निर्दशनास आले. कार ही भरवाद वेगाने होती. त्यामुळं रस्त्याच्या बाजूस असलेल्या सुरक्षा कठड्यास वेगाने धडक दिली. दरम्यान, या अपघातानंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नरेंद्र मेहता १९९७ मध्ये राजकारणात आले. ते महापालिकेचे सदस्य होते आणि नंतर महापौर झाले. एक व्यापारी म्हणून मेहता बांधकाम, शिक्षण आणि आरोग्यसेवा यासह अनेक व्यवसायात आहेत. २००२ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर २०१६ मध्ये १४ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, कोर्टात संशयापलीकडे पुरावे सादर करण्यात फिर्यादी अयशस्वी झाल्यामुळे कोर्टाने त्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. २०१७ मध्ये, त्याने पत्नी सुमनला तिच्या वाढदिवशी एक महागडी आलिशान कार भेट दिली तेव्हा चर्चा झाली. श्रीमती मेहता यांनी गाडी चालवताना ऑटोला धडक दिल्याने मेहता पुन्हा राजकीय लक्षाच्या केंद्रस्थानी दिसले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023, केएल राहुल पूर्णपणे फिट, श्रीलंकेला लवकरच होईल रवाना …

पुणे शहरात पाणी कपात होणार की नाही ? बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss