spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या’ दिवसांपासून ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत धावणार…

मुंबईतील (Mumbai News) दादर रेल्वे स्थानकामधील रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी आता परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादर स्टेशनमधील (Dadar Station) प्लॅटफॉर्म एकची रुंदी वाढवण्यात येणार आहे. अशावेळी गर्दीचं नियोजन करण्यासाठी दादर लोकलच्या ११ फेऱ्या परळपर्यंत (Parel) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून निघते. पण दादर हे सर्वात गर्दीचं स्टेशन असल्यामुळे आणि १५ सप्टेंबरपासून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार असल्यानं १५ सप्टेंबरपासूनच दादर लोकल परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी २७ मीटर आणि रुंदी सात मीटर आहे. आता ही रुंदी साडेदहा मीटर केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यांत प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील (Mumbai News) दादर रेल्वे स्थानकामधील रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी आता परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या लोकल दादरच्या फलाट क्रमांक दोनवर (Platform number two) येतात. मात्र त्या १५ सप्टेंबरपासून परळपर्यंत धावतील आणि तेथूनच डाऊन दिशेकडे मार्गस्थ होतील. का हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोणत्या लोकल फेऱ्यांमध्ये बदल?

ठाणे-दादर लोकल :

सकाळी ८.०७ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सकाळी ८.१३ वाजता परळला पोहोचेल आणि सकाळी ८.१७ वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.

टिटवाळा-दादर लोकल :

सकाळी ९.३७ वाजता दादरला पोहोचणारी लोकल परळला सकाळी ९.४२ वाजता पोहोचेल आणि कल्याणसाठी सकाळी ९.४५ वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.

कल्याण-दादर लोकल :

दुपारी १२.५५ वाजता दादरला पोहोचणारी लोकल दुपारी १२. ५८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी दुपारी १.०१ वाजता सुटेल.

ठाणे-दादर लोकल :

सायंकाळी ५.५१ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ५.५४ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ५.५६ वाजता परळहून डोंबिवलीसाठी निघेल.

ठाणे-दादर लोकल :

सायंकाळी ६.१० वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ६.१३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल.

डोंबिवली-दादर लोकल :

सायंकाळी ६.३५ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ६.३८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी ६.४० वाजता सुटेल.

ठाणे-दादर लोकल :

सायंकाळी ७.०३ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.०६ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ७.०८ वाजता परळवरून कल्याणसाठी सुटेल.

डोंबिवली-दादर लोकल :

सायंकाळी ७.३९ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.४२ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी सायंकाळी ७.४४ वाजता सुटेल.

ठाणे-दादर लोकल :

सायंकाळी ७.४९ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.५२ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ७.५४ वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.

कल्याण-दादर लोकल :

रात्री ८.२० वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री ८.२३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी रात्री ८.२५ वाजता सुटेल.

ठाणे-दादर लोकल :

रात्री ११.२० वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री ११.२३ वाजता परळला पोहोचेल आणि रात्री ११.२५ वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.

हे ही वाचा: 

यंदाचा गणेशोत्सव होणार अधिकच भक्तिमय, अमृता खानविलकरचा पहिलंवहिलं गाणं ‘गणराज गजानन’ भाविकांच्या भेटीला

शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss