मुंबईमध्ये गॅस्ट्रोची लागण

वातावरणातील बदल, बाहेरील खाण्याचे वाढते प्रमाण, चुकीची जीवनशैली यामुळे मुंबईकरांमध्ये पोटदुखीच्या तक्रारी बळावल्या आहेत.

मुंबईमध्ये गॅस्ट्रोची लागण

वातावरणातील बदल, बाहेरील खाण्याचे वाढते प्रमाण, चुकीची जीवनशैली यामुळे मुंबईकरांमध्ये पोटदुखीच्या तक्रारी बळावल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या तक्रारींमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात २०२२मध्ये ५५३१ जणांना गॅस्ट्रोचा त्रास झाला होता. तर यंदा आत्तापर्यंत ६,६७७ रुग्णांची नोंद झाली आहे.

जून महिना सुरू झाला असला तरी उकाडा कमी झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसाला चाळीस ते पन्नास रुग्णांची नोंद होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या उष्म्यावर उतारा म्हणून उसाचा रस, बर्फ घालून शीतपेयाचे प्यायली जाते. त्यामुळेही पोटाच्या तक्रारी बळावल्याची शक्यता असते, असे डॉक्टर सांगतात. उष्मा वाढल्यानंतर अन्नातून विषबाधा होण्यासह इतर संसर्गाच्या तक्रारीही वाढतात. विषाणू संसर्गाचे योग्यवेळी निदान न झाल्याने या आजाराची तीव्रता वाढते,वरचेवर बाहेर खाण्याची ज्यांना सवय असते त्यांना पोटदुखीचा त्रास वारंवार होतो. या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. शौचास साफ न होणे, अपचन, गॅसेस, अॅसिडीटी या तक्रारींकडे योग्यवेळी लक्ष द्यायला हवे. अन्यथा त्या तक्रारी बळावतात. आणि त्यामुळेच विषाणू, जिवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो होतो.

दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ यामुळे हा संसर्ग होतो. डायरिया हे ‘गॅस्ट्रो एन्टरायटिस’च्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. भूक मंदावते. त्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. उलट्या-जुलाब आणि सुरुवातीला पोटात मुरडा येतो. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. अगदी दिवसाला २० ते ३० उलटय़ा आणि त्याच प्रमाणात जुलाब होतात. त्यामुळे बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण ठाव जेणेकरून आपल्याला गॅस्ट्रो सारख्या रोजगाशी सामना करावा लागणार नाही.

हे ही वाचा:

काँग्रेसने केले भारत चीन सीमावादावरुन मोदी सरकारला प्रश्न

कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार, सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version