spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घाटकोपरमधील दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये खळबळ

मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील दुमजली इमारतीचा भाग अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जण अटकल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. या दुर्घटनास्थळी अग्निशमन दल (fire brigade)आणि एनडीआरएफ (NDRF) दाखल झाले आहे.

मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील दुमजली इमारतीचा भाग अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जण अटकल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. या दुर्घटनास्थळी अग्निशमन दल (fire brigade)आणि एनडीआरएफ (NDRF) दाखल झाले आहे. बचावकार्य (Rescue work) सुरु असून ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याचा अंदाज असून त्यांचे शोधकार्य सुरु आहे.

ही दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना समोर आली असून सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे असे समोर आले आहे. ही इमारत ४० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. यात पावसामुळे अनेक जागी हे पाणी साचले असून पावसामुळेच इमारतींचा भाग खचल्याचे बोलले जात आहे. याबाबत अजूनतरी कोणती अधिकृत माहिती मिळाली नाही.मुंबईतील पहिल्याच पावसात ही दुर्घटना झाल्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

दरम्यान आता दुर्घटनास्थळी माजी शिक्षण मंत्री आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दुर्घटनास्थळी जाऊन स्वतः परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ‘विद्याविहारमध्ये इमारत कोसळली आहे आणि त्यात दोन जण अडकलेले आहेत .याची चौकशी ही झालीच पाहिजे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.याप्रसंगी मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, नालेसफाई झालेली नाही. मुंबईत जागोजागी पाणी तुंबून राहिले आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत काळजी घ्यायला हवी. पहिल्या पावसातच हे चित्र आहे. पावसाच्या आधीच मुंबई मनपाची तयारी व्हायला हवी होती. लोकांच्या जीवाशी खेळ व्हायला नको.’

वर्षा गायकवाड यांनी पुढे असे सांगितले की, ‘गोवंडीत दोन नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या कामासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नये म्हणून काम करायला पाहिजे. अधिकाऱ्यांवर याबाबत कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून पाहणी करण्यास कोणी नाही. पण प्रशासक आहेत, कारवाई ही झालीच पाहिजे.’

 

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss