spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gold Slver Rate Today: सोन्याचांदीच्या दरात घसरण कायम; पहा आजचे दर

Gold Slver Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प काल (मंगळवार, २३ जुलै) जाहीर केला. यावेळी त्यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी ६% कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. त्यामुळे देशभरात सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये कस्टम ड्युटी १५ टक्के करण्यात आली होती. आता १५ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यांवर आणली गेली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी ६% कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषणेनंतर काही तासांमध्येच सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Price in India) मोठी घसरण झाली आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत प्रती तोळा ५,९०० रुपये सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात ७,६०० रुपये प्रती किलो घसरण झाली आहे. मुंबईत सोमवारी सोन्याचा दर प्रतीतोळा ७३,५०० रुपये इतका होता. हा दर बजेटनंतर थेट ६७,६०० रुपये झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही सोन्याचे दर २ हजारांनी कमी झाले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासूनच सोन्याच्या किमतीत घसरण सुरु आहे. सोन्याच्या दरवाढीला १८ जुलैपासून ब्रेक लागला असून २२ जुलै पर्यंत सोने १२० रुपयांनी उतरले. २३ जुलै रोजी त्यात ३०० रुपयांची घसरण झाली. परंतु आता कस्टम ड्युटीवरील कपातीमुळे सोन्याच्या किमतीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली आहे. आज (बुधवार, २४ जुलै) सकाळच्या सत्रात सोन्याने घसरणीचे संकेत दिले असून २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५ हजार १०० रुपये प्रतितोळे तर २४ करत सोन्याचा भाव ७१ हजार १० रुपये प्रतितोळे आहे.

चांदीच्या दरात देखील मोठी घसरण पाहायला मिळत असून आज सकाळच्या सत्रात एक किलो चांदीचा भाव ८८ हजार आहे. जुलैच्या सुरुवातीला चांदीने मोठी मुसंडी मारली होती. अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीवरील कपातीचा निर्णय होताच चांदी ३ हजार ५०० रुपयांनी घसरली आहे.

हे ही वाचा:

BUDGET SESSION OF PARLIAMENT : MODI GOVERNMENT चा आज ३ऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प होणार जाहीर..

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रसरकासरची इंटर्नशिप योजना नेमकी काय आहे.. ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss