spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मेट्रो कधी सुरु होणार हा नवी मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रश्न आहे. आता नवी मुंबई मेट्रो चे काम सुरु होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडत असल्याचे दिसून येत आहेत.

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मेट्रो कधी सुरु होणार हा नवी मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रश्न आहे. आता नवी मुंबई मेट्रो चे काम सुरु होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडत असल्याचे दिसून येत आहेत. विमानतळ सुरु झाल्यावर प्रवासी वाहतूक सोपी व्हावी यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्राने जोडण्याची आखली आहे. सिडको आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्था संयुक्तपणे या मार्गाचे काम पाहणार आहेत. नवी मुंबईमधील परिसरामध्ये शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ हे काम पाहणार आहे आणि मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए या कामाची पाहणी करणार आहे.

मेट्रो ८ कॉरिडॉरमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहे. २०१४ पासून एमएमआरडीए या मेट्रो मार्गासाठी प्रयत्नशील आहे. जवळपास ३५ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या मार्गावर सात स्थानक असणार आहेत आणि दररोज नऊ लाख प्रवाशांना याचा फायदा होणार नाही. प्रस्तावित मार्गानुसार ही लाईन अंशत: भूमिगत असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी आणि ईस्टर्न एक्सप्रेस वे दरम्यान हा मार्ग भूमिगत असणार आहे. घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असणार आहे. भूमिगत प्रकल्प असल्यामुळे हा प्रचंड वेळखाऊ आणि खर्चिक असणार आहे.

नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंधर तळोजा असा ११ किलोमीटर चा हा रेल्वे मार्ग असणार आहे. परंतु अर्धवट कामामुळे गेल्या जवळपास १२ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. अखेर या मार्गावरील सर्व स्थानकांचे काम पुर्णत्वास आल्याने येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर ही मेट्रो रेल्वे सुरु करण्याचा मानस सिडकोचा आहे. यासाठी युद्ध पातळीवर कामे केली जात आहे. मेट्रो सुरु करण्यासाठी लागणारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी सुद्धा घेण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर मार्गावरील ट्रॅकवर मेट्रो गाडी चालवून अनेक चाचण्या सुध्दा घेण्यात आल्या आहेत. मेट्रो सुरू झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या खारघर , तळोजा भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss