मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात एक मोठी अपडेट समोर…

मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो ७अ च्या (Mumbai Metro 7A) मार्गातील बोगद्यासाठी पहिल्या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरणाचे काम सुरू केले असून, प्रकल्पातील ही महत्त्वपूर्ण प्रगती आहे.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात एक मोठी अपडेट समोर…

मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो ७अ च्या (Mumbai Metro 7A) मार्गातील बोगद्यासाठी पहिल्या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरणाचे काम सुरू केले असून, प्रकल्पातील ही महत्त्वपूर्ण प्रगती आहे. मुंबई मेट्रो मार्ग ७ चा विस्तार असणारी मेट्रो ७अ प्रकल्पातील ही प्रगती मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सुमारे ३.४४२ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग ७अ प्रकल्पाच्या मार्गातील २.४९ किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने ०१ सप्टेंबर २०२३ रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले असून, ही प्रारंभिक मोहीम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे.

यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १२ ते २८ मीटर इतका खोल बोगदा असणार आहे. ज्याच्यामुळे भूमिगत मेट्रो ते उन्नत मेट्रोपर्यंतचा प्रवास सुलभतेने होणार आहे. हे काम निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावे या साठी २४ तास भुयारीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त केलेले संघ प्रमुख (टीम लीडर्स) हे या कामाची देखरेख करून प्रकल्पाची प्रगती सुनिश्चित करतील. मेट्रो मार्ग ७अ च्या बोगद्याच्या मार्गात अडसर ठरणारी भुयारी गटर लाईन मायक्रो टनलिंग पद्धतीचा वापर करून यशस्वीरित्या वळवली. या मर्गिकेतील अत्यंत महत्त्वाचा असलेला हा टप्पा ३० जानेवारी २०२३ रोजी पार करून टीमने हे काम कुशलतेने यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.

कार्यान्वयीत असलेल्या मेट्रो मार्ग ७ चा विस्तार असलेली, अंधेरी पूर्व (Andheri East ) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) दरम्यान सुमारे ३.४४२ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग ७अ प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीमध्ये सकारात्मक परिवर्तन निश्चित घडेल. या मार्गिकेतील अंशतः भाग पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सहार उन्नत मार्गास समांतर धावते. ही मेट्रो मार्गिका छ.शि.म.आं. विमानतळासोबत मिरा-भाईंदर (Mira-Bhyander) शहरास मेट्रो मार्ग ९च्या सहायाने तर पश्चिम उपनगरांना मेट्रो मार्ग २अ आणि ७च्या सहाय्याने थेट जोडते. तसेच मेट्रो मार्ग ७अ चे छ.शि.म.आं.वि. स्थानक आणि मेट्रो मार्ग ३चे भूमिगत स्थानक हे समांतर आणि पेड- टू- पेड आणि अनपेड- टू- अनपेड भागात कॉन्कोर्स स्तरावर जोडले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गिकेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल (interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा कालावधीत ३०-६० मिनिटांनी कमी होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांची जोडणी अधिक वेगवान करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्ग ८ द्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत (Navi Mumbai International Airport) जोडण्यासाठी मुंबई मेट्रो मार्ग ७अ एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

हे ही वाचा: 

‘कुशी’ चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याने घेतली तब्बल इतके कोटी …

मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर , मराठवाड्यातील बस सेवा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version