Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

मुंबई लोकलने आता जेष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर दिली आहे. आता लोकलच्या मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केले जाणार आहे.

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. संपूर्ण दिवसभर लाखो मुंबईकर लोकल ट्रेनमधून (Local Train) प्रवास करतात. यामध्ये लहान मुलं, स्त्रिया, पुरूष, जेष्ठ नागरिक सर्वच जण प्रवास करत असतात. परंतु ज्येष्ठ प्रवाशांना नेहमीच लोकलमध्ये बसण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र आता मध्य रेल्वेने (Central Railway) यावर एक चांगलाच उपाय शोधला आहे.

मुंबई लोकलने आता जेष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर दिली आहे. आता लोकलच्या मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केले जाणार आहे. जनहित याचिकेच्या उत्तरादाखल मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. लोकलमधील मालडब्यांतील आसने वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचे नियोजन पूर्ण केलं आहे. के.पी. पुरुषोत्तम्म नायर यांनी रेल्वे प्रशासना विरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेला उत्तर दिले.

 

तसेच मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात माल डब्यातील ९० टक्के प्रवासी सर्वसामान्य असल्याचे दिसून आल्याने, माल डब्यात आवश्यक ते बदल करुन आसन क्षमता वाढवून ते डबे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये ८८ आसनांसह चार प्रथम श्रेणीचे डबे, तीन महिला डबे, दिव्यांग प्रवाशांसाठी ३८ आसनांचे दोन डबे आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतील.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

दिल्लीत होणाऱ्या NDA बैठकीला, Eknath Shinde – Ajit Pawar लावणार हजेरी

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version