मुंबईत अतिरिक्त टोल वसुली बाबत सरकारची सभागृहात कबुली

टोलवसुली संदर्भात वेगवेगळ्या आमदारांनी राज्यात अनेक ठिकाणी सद्यस्थितीत टोल सुरू असून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे.

मुंबईत अतिरिक्त टोल वसुली बाबत सरकारची सभागृहात कबुली

रस्त्यांची दूरवस्था असतानाही टोलवसुली (Toll) सुरू असल्याची कबुली सरकारने आज विधानसभेत दिली आहे, तसेच राज ठाकरे यांच्या भूमिकेला राज्य सरकारने दुजोरा दिला आहे. तसेच मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू असल्याची देखील कबुली दिली आहे. रस्त्याचा खर्च वसूल झाला तरी नागरिकांकडून टोल आकारण्यात येतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह इतर विधीमंडळ सदस्यांनी सरकारकडे टोलसंदर्भात विचारणा केलेली होती. टोलवसुलीचं उद्दिष्ट साध्य करुनही राज्यात टोलवसुली सुरु असल्याची कबुली सरकारने दिली आहे.
YouTube video player

टोलवसुली संदर्भात वेगवेगळ्या आमदारांनी राज्यात अनेक ठिकाणी सद्यस्थितीत टोल सुरू असून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे. एवढच नाही तर रस्त्यांची दूरवस्था असल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे का असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनाी हे अंशत: खरे आहे असे उत्तर दिले. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अंतर्गत एकूण दहा प्रकल्पवर टोल वसुली प्रगतीपथावर आहे. निविदेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत रस्त्यांची आणि पुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते असे उत्तर दिलं.

मुंबईत अतिरिक्त टोल वसुली सुरू असल्याची सरकारची कबुली
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या ५५ पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या पाच टोल नाक्यांवर पुलांचा खर्च वसूल होऊनही अद्याप टोल वसुली सुरू असून त्यात दरवाढ करण्यात आली आहे का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला . त्यावर दादा भुसे यांनी उत्तर खरे आहे दिले. म्हणजे मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू आहे. मुंबईतल्या ५५ उड्डाणपुलासाठी खर्च १ हजार २५९. ३८कोटी झाला होता. २०२६पर्यंत ३३ हजार२७२ कोटी वसुल होणार आहे. म्हणजे या प्रश्नानंतरही टोलवसुली सुरूच राहणार आहे.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
टोलच्या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि सरकारचे अधिकारी यांच्यात टोलबाबत काही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले होते.

अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केले जाते असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात आला.

हे ही वाचा:

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version